ग्रामसभेद्वारे ग्राम वनहक्क समितीचे गठन करणे व सामूहिक संसाधनांची निश्चिती करणे.
ग्रामसेवक यांनी गठीत ग्राम वनहक्क समितीची महावनमित्र प्रणालीमध्ये नोंद करणे.
ग्राम वनहक्क समिती व वैयक्तिक दावेदार यांनी आपापल्या वनहक्क दाव्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंद करणे.
मा. तहसीलदार यांनी ग्रामपंचायतनिहाय वनहक्क समितीकडे नोंदणीकृत दाव्यांसाठी पडताळणी सभेचे नियोजन करणे.
नियोजित कार्यक्रमानुसार संबंधित अधिकारी व ग्राम वनहक्क समितीने प्रत्यक्ष जागेची पाहणी करणे, जमिनीची मोबाईल अ‍ॅपद्वारे मोजणी करणे व अर्ज आणि पुराव्यांची पडताळणी करणे.
ग्राम वनहक्क समितीने पडताळणीसाठी उपस्थितांची हजेरी भरणे व दाव्यासंबंधीचा पडताळणी निष्कर्ष सादर करणे.
ग्रामसभेचे आयोजन करून पडताळणी झालेल्या सामूहिक अथवा वैयक्तिक वनहक्क दाव्यांसंदर्भात ग्रामसभा ठराव पारीत करणे.
ग्राम वनहक्क समिती व वैयक्तिक दावेदार यांनी जवळच्या शासनमान्य संगणक सेवा केंद्रातून आपापल्या दाव्यांसंदर्भात आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून दावे दाखल करणे.
उपविभागस्तरीय वनहक्क समितीने एकत्र बैठक घेऊन दाखल झालेल्या दाव्यांची छाननी करणे व दाव्यांसंदर्भात शिफारस नोंदविणे.
१०
जिल्हास्तरीय वनहक्क समितीने एकत्र बैठक घेऊन उपविभागस्तरीय समितीने शिफारस केलेल्या दाव्यांवर अंतिम निर्णय घेणे.
११
वनहक्क मान्यता मिळालेल्या दावेदारांना वनहक्काचे अभिलेख / प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरीत करणे.